उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील डाळींब येथे एसएचके केमटेक एलएलपी कंपनी उमरगा मार्फत मक्का पीक विषयी मार्गदर्शन परिसंवाद मेळव्याचे आयोजन करण्यात आलेले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाऊसाहेब बिराजदार बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार, तर मुख्य मार्गदर्शक म्हणून सिनियर कृषितज्ज्ञ मा. डॉ बी डी जडे, जैन ईरेगिशन लिमिटेड जळगाव व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी डी. बी. रितापुरे, यशवंत वानखेडे एम जी एम महाराष्ट्र बँक, प्रशांत जैसवाल, सरपंच परशुराम देवकते, बाबा जाफरी, सुनील कोचेटा, नीलम अजमेरा , प्रथमेश कोचेटा, श्रेयांश अजमेरा, सुनील होनराव जनरल मॅनेजर एस एच के कंपनी व सर्व कर्मचारी व गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचे मनोगत व त्या नंतर प्रामुख मार्गदर्शकाचे मका पिका विषयी सविस्तर मार्गदर्शन , हॅक्क्टरी मिळणारे उत्पादन, व नफा, पूर्वतयारी, संगोपन या विषयी सविस्तर मार्दर्शन झाले अध्यक्षीय सामारोप करत असताना सुरेश बिराजदार यांनी मका पिकातुन उत्पादन व शिल्लक राहिलेल्या धाटा पासून निर्माण होणारे नॅच्युरल गॅस व त्यातून होणार नफा या वर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सरपंच परशुराम देवकाते, उपसरपंच ओमप्रकाश टिकांबरे, असिफ शिलार, बालाजी सातपुते, इरफान झागिरदार, ग्रामपंचायत कर्मचारी व एस एच के कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.