धाराशिव (प्रतिनिधी)धाराशिव शहरातील आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रशालेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योग प्रात्यक्षिक करून योग दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
यानिमित्ताने योग शिक्षक श्री खानवाटे सर
यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य सुदृढ राहून अभ्यासात प्रगती करण्यासाठी तसेच तंदुरुस्त मन आणि बौद्धिक विकासासाठी योगासने नियमित करण्याचे आवश्यकता व्यक्त केली.यावेळी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार तसेच विविध योगासनांची प्रात्यक्षिकासह माहिती देऊन त्यांचे स्वास्थ्यासाठी दररोजच्या आयुष्यात किती महत्त्वाचे स्थान आहे यावर विशेष माहिती सत्र ही झाले.