तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील कुंभारी येथील ओबीसी प्रवर्गातुन महिला  सरपंच पदीविराजमान होण्याचा मानकुणबी मराठा समाजाचा सौ  वर्षाराणी संतोष  वडणे यांना शुक्रवार  दि 30रोजी मिळाला जिल्हयातुन पहिल्या कुणबी मराठा ओबीसी  प्रवर्गातुन सरपंच होण्याचा मान माँ जिजाऊची लेकी समान  वर्षाराणी वडणे यांना मिळाला.

कुणबी मराठा ओबीसी प्रवर्गातुन सरपंच होण्याचा पहिला वर्षाराणी वडणे यांना मिळाताच  सकल मराठा समाजाने एकच जल्लोष करुन आनंदोत्सव साजरा केला. कुभारी गावचे सरपंच पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होते. पुर्वी या पदावर  संगीता नागेश कोळी विराजमान होत्या. माञ त्याची कास्ट व्हेलिडीटी झाली नसल्याने त्यांचे सरपंच पद रद्द  झाले. कुंभारी येथील ओबीसी महिला सरपंच पदासाठी शुक्रवार दि. 30 मे रोजी विशेष सभा बोलविण्यात आली. या सभेसाठी निवडणुक निर्णय अधिकारी तथा विस्तार अधिकारी कावळे होते. या सरपंचपदासाठी कुणबी मराठा समाजाचा वर्षाराणी संतोष वडणे यांचा एकमेव्य अर्ज आला. तो वैध ठरल्याने त्यांची सरपंचपदी निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले.


दादांच्या संघर्षामुळे मी सरपंचपदी विराजमान- नुतन सरपंच वर्षाराणी वडणे 

यावेळी बोलताना वर्षाराणी वडणे म्हणाल्या कि, माझे पती संतोष हे मराठा आरक्षण संघर्षात कायम मनोज दादा बरोबर संघर्ष करीत आहेत. एक वर्षापुर्वी मला मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे कुणबी प्रमाणपञ मिळाल्याने मला सरपंचपदी विराजमान होण्याचा मान फक्त  दादांमुळे मिळाल्याचे सांगुन, यापुढे सर्वजाती धर्माला सोबत घेवुन राजमाता माँ जिजाऊ आर्दश समोर ठेवुन गावचा विकास करणार आहे. लवकरच मी पतीसह मनोज दादांचा आशिर्वाद घेण्यासाठी जाणार असल्याची प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी दिली.

 
Top