धाराशिव (प्रतिनिधी)- गावातील शेतकरी व प्रसारमाध्यमे यांच्यातील दुरी कमी व्हावी व शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी आळणी महाविद्यालयातील कृषिदुतांच्या वतीने ग्रामपंचायत तेर येथील कार्यालयासमोर माहिती फलक उभारण्यात आला आहे. गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या माहिती फलकाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास गावच्या सरपंच दीदी लोकेश काळे, उपसरपंच श्रीमंत रमेश फंड, कृषी सहाय्यक राम व्यंकट शिंदे, ग्रामसेवक बाबासाहेब खोचरे, उपक्रमाचे समन्वयक व्यवस्थापक हरि घाडगे,  प्रमुख प्रा. देवानंद शेटे, प्राचार्य डॉ. क्रंतिकुमार पाटील,प्रा. अमित गांधले, प्रा. प्रताप खोसे उपस्थित होते. 

याप्रसंगी कृषिदूत प्रणय कोकाटे, जगदिश बसाटे, रमन घोरपडे, अशोक यादव, अमोल मायकर, साहिल सांगुळे व संकेत सांगुळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत माहिती फलकाचे महत्त्व पटवून सांगितले. तर कृषिदुतांनी इथून पुढे शेतकऱ्यांच्या व शेतीशी निगडित बातम्या, लेख, छायाचित्रे व इतर बाबी माहिती फलकावर दर्शवल्या जातील असे सांगितले. यावेळी तेर येथील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top