धाराशिव (प्रतिनिधी)-  संत श्री गजानन महाराज शेगाव पालखीचे धाराशिव शहरात भक्तिमय वातावरणात उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखीसोबत डॉ. प्रतापसिंह पाटील व व्ही. पी. शैक्षणिक संकुल,छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव यांच्या वतीने फिजिओथेरपी कॅम्प व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि उपचारांची सोय करण्यात आली होती. या शिबिराचा 478 वारकरी बांधवांनी लाभ घेतला.

या शिबिरात विविध आरोग्य तपासण्या जसे की रक्तदाब,मधुमेह, आणि इतर सामान्य आजाराची तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार औषधोपचार आणि फिजिओथेरपीची सोय देखील करण्यात आली होती. या शिबिरामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण झाली आणि त्यांना आरोग्य सेवांचा लाभ घेता आला.

या शिबिराच्या  उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील, कुणाल निंबाळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, युवती जिल्हाध्यक्ष श्वेता दुरुगकर, तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख, अमोल सुरवासे, डॉ. संतोष मुळे व अशोक चौधरी उपस्थित होते.शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. पूजा आचार्य, डॉ. गणेश गोरे, डॉ. चाकवते, डॉ. शेख तसेच वेलनेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, आर. पी. फार्मसी कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top