तुळजापूर (प्रतिनिधी)-  राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त समाज कल्याण, धाराशिव आयोजित “सामाजिक न्याय दिन“ निमित्त भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान, सोलापूर (यमगरवाडी) यांना जिल्हास्तरावरील मिळालेला फुले, शाहू, आंबेडकर पुरस्कार  जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील  यांच्या हस्ते देण्यात आला. तो प्रतिष्ठानचे सदस्य ॲड. जनक धनंजयराव कदम पाटील आणि सदस्य डॉ. प्रणिता गाडेकर यांना स्विकारला.

यावेळी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल एकलव्य विद्या संकुल प्रकल्पचे मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे, ॲड. जनक पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष  उद्धव काळे, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, कारवाह विवेकराव आयाचित, कोषाध्यक्ष नरेश पोटे, व इतर सदस्य यांनी आनंद व्यक्त केला.

 
Top