धाराशिव (प्रतिनिधी)- एका अल्पवयीन मुलीला 2017 पासून सलग सात वर्षे आय-पिलच्या गोळ्या खायला घालून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या गुन्ह्यात तरूणाला मदत करणाऱ्या आणि पिडीतेला वाढदिवसाला एका रात्रीसाठी गिफ्ट देते असे म्हणाणाऱ्या एका महिलेसह दोघांवर कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पिडित 24 वर्षीय तरूणीने दिलेल्या फिर्यादीनुसार 2017 साली ती अल्पवयीन असल्यापासून ते ऑक्टोबर 2024 पर्यंत गावातीलच एका तरूणाने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. पिडीता अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपी तरूणाने तिला आय-पिलच्या गोळ्या खाऊ घालू नहे कृत्य केले.
या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेने अखेर 16 जून 2025 रोजी कळंब पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरूण आणि त्याला मदत करणाऱ्या महिलेविरोधात भारतीय न्याय संहिता कलम-64(2),(एफ) (आय) (एम), 69, 55 पोक्सो कलम 4, 6, 16 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.