धाराशिव (प्रतिनिधी)- महायुती सरकारने निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव शहरातील शिंगोली विश्रामगृहासमोर गुरुवारी (दि.12) चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदन बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना  देण्यात आले. निवेदनावर पक्षाचे जिल्हा सचिव प्रवीण कोकाटे,प्रदीप साळुंके, राजेंद्र घोडके, दत्ता बंडगर,विजय सस्ते, तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे,युवासेना तालुका प्रमुख राकेश सूर्यवंशी,युवासेना शहरप्रमुख अभिराज कदम, नगरसेवक राजाभाऊ पवार, बाळासाहेब काकडे, पांडू भोसले, राणा बनसोडे, गणेश असलेकर, देवानंद एडके, पंकज पाटील, अक्षय खळदकर, सतीश लोंढे, कलीम कुरेशी, गफुर शेख, शौकत शेख, अशोक पेठे, मिलिंद पेठे, असद रजवी, मुजीब काझी, भारत शिंदे, अण्णासाहेब देटे, सौदागर जगताप, बाळासाहेब वरुडकर, किरण बोचरे, बालाजी मगर, मंगेश काटे, सागर शेरकर, विश्वजित खोचरे, प्रवीण केसकर, अभिजित देशमुख, मनोज पडवळ, महेंद्र शिंदे, नंदू माने, नाना घाटगे, प्रसाद राजे, प्रशांत जगताप,अबरार कुरेशी यांची स्वाक्षरी आहे.

 
Top