तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील पोलीस ठाणे तामलवाडी हद्दीतील मौजे सावरगाव येथे शनिवार दि. 31 मे रोजी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढुन बैठक घेण्यात आली.
जनजागृती रॅली नंतर सुयोग हॉस्पिटल तामलवाडी येथे घेण्यात आलेल्या बैठकीत सहायक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर उपस्थित होते. सदर बैठक रॅलीमध्ये व्यसनाधीन आयुष्य बाबत व व्यसनमुक्ती बाबत जनजागृती पर मार्गदर्शन करुन व्यसनापासुन दूर राहण्याचे आवाहन केले. सदर रॅली बैठकीस सरपंच राजकुमार पाटील, भाजपा माजी तालुकाध्यक्ष संतोष बोबडे व इतर प्रतिष्ठित नागरिक व डॉक्टर सह पन्नास ते साठ ग्रामस्थ उपस्थितीत होते.