भूम (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील माणिकनगर शेळगाव येथे मुलगी सारखी आजारी पडत असल्याने व ती सायकलवरून पडल्याने रागाच्या भरात कुऱ्हाडीने मारून गौरी ज्ञानेश्वर जाधव (वय 9) तिच्या वडिलाने त्यांच्या राहत्या घरी हत्या केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेळगाव गावातील ज्ञानेश्वर जाधव यांची मुलगी गौरी सारखी आजारी पडत असत. त्यातच ती सायकलवरून पडली. त्यामुळे चिडलेल्या बापाने गौरी जाधव कुऱ्हाड चालवून हत्या केली आहे. या घटनेने शेलगाव सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व प्रकारची माहिती घेऊन दि 30 रोजी भूम तालुक्यातील आंबी येथील पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरी हिच्या वडिलांनी कुऱ्हाडीने तिच्या डोक्यात, कपाळावर, डाव्या व उजव्या खांद्यावर गंभीर दुखापत करून तिला ठार मारले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोरक्ष खरड करत आहेत. दरम्यान या प्रकारामुळे शेळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून बापाकडून स्वतःच्या मुलीचा अत्यंत वाईट पध्दतीने खून केल्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी भूम तालुक्यातील आंबी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.