भूम (प्रतिनिधी)-  आरक्षणाचे जनक शिक्षणाचा प्रवाह गोरगरिबापर्यंत पोहोचवणारे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा भूम येथे साजरी करण्यात आली. राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळा भूम येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

गरजवंत घटकासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी अविरत आपल आयुष्य अर्पण करणारे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा या माध्यमातून  जोपासण्याचा छोटासा प्रयत्न.प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी यावेळी शिक्षक  के सी.पवार, डि जी. पाटील, यु पी पायघन, डी एस गुंजाळ,विठ्ठल बाराते,रोहित गायकवाड, अक्षय गाढवे, दीपक बोडके, मुशीर शेख 'अथर्व रणदिवे, श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान भूमचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते .जिल्हा परिषद सकाळी शहरात राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली.

 
Top