तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील तुळजाभवानी महाविद्यालय हे 16 जूनला सुरू झाले आणि पहिल्याच दिवशी निर्मला सचिन पवार आणि सचिन कल्याण पवार यांनी तुळजाभवानी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी 80 वेगवेगळ्या विषयांवर आधारित एकुण दहा हजार किमतीचे पुस्तके भेट स्वरुपात दिली.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ जीवन पवार यांच्या हस्ते सचिन पवार व निर्मला पवार यांचा सत्कार करण्यात आला,प्र प्राचार्य डॉ जीवन पवार यावेळी म्हणाले की, महाविद्यालयात करिअर कट्टा हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुरू असुन या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, महाविद्यालयाचे ग्रंथालय हे विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी असते, जीवनात यशस्वी होण्यासाठी पहिलीच पायरी ही अभ्यासाची असते एकदा का ही वेळ निघून गेली ती पुन्हा वापस येणार नाही, ज्ञान दिल्यानेच ज्ञान वाढत असते असे अनमोल विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले,सदर प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

 
Top