तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मंदिरात सोमवार दि. 23 जून रोजी रात्री साडेदहा वाजता अतिरेकी घुसल्याचे वृत्त पसरताच मंदीरांसमोर एकच गर्दी झाली होती. माञ ही माँक ड्रील असल्याचे समजताच सर्वानी मोकळा श्वास घेतला.
डेमो दरम्यान, दोन भाविक जखमी झाले असल्याचे दाखवण्यात आले. जखमींना तात्काळ स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले. एक अतिरेकी पकडण्यात आल्याचेही दाखवण्यात आले. या संपूर्ण कारवाईत पोलिस, अग्निशमन दल, मंदिर कर्मचारी आणि सशस्त्र पोलिस सहभागी झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित मंदिरात प्रवेश करून परिसराची पाहणी केली. अग्निशमन दलाने आपत्कालीन मदतकार्य केले.