धारशिव (प्रतिनिधी)- डॉ.व्ही. पी. एज्युकेशनल कॅम्पस,छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथील श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित कॉलेज ऑफ डी फार्मसीने  प्रथम व द्वितीय वर्षामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने डी फार्मसी च्या उन्हाळी परीक्षा मे 2025 मध्ये घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये डी फार्मसी प्रथम वर्षातून  प्रथम क्रमांक  विशाल डोंगरे 76. 10%,द्वितीय क्रमांक दिनेश  माणियार 75.10% , तृतीय क्रमांक सानिया शेख 73.90% तसेच द्वितीय वर्षातून प्रथम क्रमांक सायली शिंदे 86.09%, द्वितीय क्रमांक संध्या टेकाळे 77.91%  तर तृतीय क्रमांक इन्सा पटेल 72.82%  गुण मिळवून यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील,संस्थेचे मार्गदर्शक करण प्रतापसिंह पाटील तसेच प्राचार्य डॉ.सूरज ननवरे, प्रा.सतीश केदार, प्रा.निखिल शेरखाने, प्रा.राणी मुंडे,प्रा .ऐश्वर्या सांगडे, प्रा.संजना जाधव यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 
Top