तुळजापूर (प्रतिनिधी)- उन्हाळी सुट्यां अखेरचे दिवस, लग्नसराई, शनिवार आलेल्या बकरीईद सुट्टी लगेच रविवार साप्ताहीक सुट्टी अशा सलग आलेल्या सुट्यांच्या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांची शनिवार, रविवार भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. शनिवारी आलेला बकरी ईद लगेच रविवार सुट्टी तसेच उन्हाळी सुट्यां व लग्नसराई पार्श्वभूमीवर सध्या देविदर्शनार्थ प्रचंड गर्दी होत आहे. शनिवारी मुख दर्शनार्थ दीड ते दोन तास, धर्मदर्शन अडीच ते तीन तास, दोनशे रुपये सशुल्क दर्शन दीड ते दोन तास, पाचशे रुपये एक ते दीड तास दर्शनार्थ लागत होते. सशुल्क दर्शन रांग वाढल्याने दुपारी पेड दर्शन पासेस बंद ठेवावे लागले. तर पाचशे रुपये दर्शन रांग होमकुंडाजवळ आली होती.
भाविक वाढले दर्शन रांगा वाढवा !
सध्या देविभभक्तांचा वाढत्या प्रचंड गर्दी पार्श्वभूमीवर दर्शन रांग व्यवस्था अपुऱ्या पडत असुन दर्शन रांगा वाढविण्याची भाविकांची मागणी ञस्त भाविकांमधुन केली जात आहे.
लोकसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ दिवसेंदिवस भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. सध्याची दर्शन व्यवस्था अपुरी पडत असल्याने भाविकांना सुलभ जलद दर्शन घडविण्यासाठी मंदीर प्रशासनाने आणखी दर्शन रांगा वाढवणे गरजेचे बनले आहे. भाविकांचा वाढत्या गर्दी पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस दर्शन रांगा कमी पडत असल्याने याचा फटका भाविकांना देविदर्शनार्थ तासोनतास दर्शन रांगेत थांबावे लागत आहे. गर्दी वाढताच दर्शन रांगा भरभर हलवल्या जात असल्याने भाविकांना लांबुन येवुन तासोनतास रांगेत थांबुनही देवीदर्शन घडत नाही. भाविक वर्ग देविदर्शना नंतरच मंदीर बाहेर पडत असल्याने यामुळे मंदीरात प्रचंड गर्दी होत आहे. मंदीर गाभारा, प्रदक्षणा मार्ग भाविकांनी भरुन जात आहे. भाविकांची संख्या कमी होण्याची शक्यता नसल्याने मंदीर प्रशासनाने भाविकांना कमी वेळेत सुलभ दर्शन घडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.