परंडा (प्रतिनिधी)- शिववंशिय दशनाम गोसावी समाज महाराष्ट्र राज्य पुणे या सामाजिक संस्थेच्यावतीने दिला जाणारा सन 2024-25 चा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अनिल गिरी यांची निवड झालेली आहे.गेल्या 28 वर्षात त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन शिववंशिय दशनाम गोसावी समाज महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केलेल्या सर्वेक्षणातून त्यांची निवड केली आहे.
पुरस्कार वितरण सोहळा रविवारी दिनांक 15/06/2025 रोजी पुणे येथे महंत सुंदर गिरी महाराज, महंत शांतिगिरी महाराज,मा.आमदार विजय बापू शिवतारे,मा.आमदार चेतन दादा तुपे,मा.रविंद्र धंगेकर मा.आ.कसबा,मा.प्रशांद दादा जगताप मा.महापौर पुणे,प्रा. रवींद्र भारती सर चेअरमन भारती शेअर मार्केट, प्राध्यापक यशवंत गोसावी सर प्रसिद्ध शिवव्याख्याते , माननीय डॉक्टर धर्मवीर भारती, माननीय पंडित भाऊ गोसावी -अध्यक्ष दशनाम गोसावी समाज महाराष्ट्र राज्य, माननीय शिव शंभू दादा गोसावी संस्थापक अध्यक्ष , प्रकाश भारती अध्यक्ष ,पंकज भारती युवा अध्यक्ष, सूर्यकांत गिरी गोसावी कार्याध्यक्ष, संदीप भारती युवा प्रदेशाध्यक्ष सुदाम गोसावी प्रदेशाध्यक्ष या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
अनिल गिरी सर यांचे मुळ गाव जगदाळवाडी ता.परंडा जि.धाराशिव तर कार्यरत शाळा शेवाळेनगर (शेळगाव) त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.