धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या महत्वकांक्षी कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामाची मुख्य अभियंता अरुण नाईक, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी पदभार स्वीकाताच दोन दिवसीय क्षेत्रीय काम पहाणी दौरा नियोजित करून कामाची पाहणी केली. या प्रकल्पाचे अंमलबजावणीच्या प्रथम टप्प्यात 5.32 अ. घ. फू. पाणी उचलण्याचे प्रस्तावित असून त्याद्वारे 25987.00 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे दि 25 /6 /2025 रोजी उपसा सिंचन क्र 2 अंतर्गत घाटणे बॅरेज टप्पा क्र 1 ते रामदारा साठवण तलाव टप्पा क्र 5 मधील घाटणे बॅरेज भोयरे, पडसाळी कालवा, पडसाळी पंपग्रह, पडसाळी उद्धहरण नलिका, दारफळ सावरगाव कालवा, सावरगाव पंपग्रह, सावरगाव उद्धहरण नलिका, सावरगाव ते पांगरधरवाडी कालवा, पांगरधरवाडी पंपग्रह, पांगरधरवाडी ते मसला उद्धरण नलिका , मसला ते सिंदफळ कालवा, सिंदफळ पंपग्रह, सिंदफळ ते रामदारा उदहरण नलिका व रामदारा साठवण तलाव येथे क्षत्रिय दौरा करून संपूर्ण उपसा सिंचन योजना क्र 2 टप्पा क्र 1 ते 5 या कामाची पाहणी केली
तसेच दि 26 /6 /25 रोजी मिरगव्हाण ते सीना ( ग्रॅव्हिटी मेन ), जेऊर बोगदा व मिरगव्हाण पंप हाऊस केली. सदरील कामे विहित वेळेत व गुणवत्तापूर्वक पूर्ण करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी देऊन प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याबाबत करावयाच्या उपाय योजना बाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच सुरु न झालेले कामे सुरू करणे प्रगतीपथावरील कामे डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणे बाबत सूचना दिल्या. इंजिनीयर अरुण नाईक हे अत्यंत कार्यक्षम तत्पर तसेच अचूक निर्णय घेण्याची क्षमता असलेले अभियंता असल्याने कामांना गती येऊन डिसेंबर 2025 पर्यंत कामांना गती येऊन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यावेळी अधीक्षक अभियंता विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता अमोल नाईक, राहुल घनवट, तसेच विभागातील सर्व उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता उपस्थित होते.