भूम (प्रतिनिधी)- शाळा प्रवेश उत्सवानिमित्त श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूममध्ये नवीन शाळा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरामध्ये गुलाब पुष्प व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भूम पंचायत समितीचे गट विकास अधिकारी वाजे, भूम परंडा वाशी भाजपा विधानसभा सदस्य बाळासाहेब क्षिरसागर, संस्थेचे सचिव सतीश देशमुख, बाबासाहेब वीर, भूम शहर भाजपा अध्यक्ष  हभप पोपट जाधव, शाळेचा माजी विद्यार्थी किशोर कात्रजकर व मोठ्या प्रमाणात पालकवर्ग उपस्थित होते. याप्रसंगी गट विकास अधिकारी वाजे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच बाळासाहेब क्षिरसागर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट बांगर यांनी केले. अध्यक्षीय समारोपाचे भाषण शाळेचे मुख्याध्यापक दत्ता भालेराव यांनी केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 


 
Top