तुळजापूर (प्रतिनिधी)- जय भवानी महीला व शिक्षण प्रसारक मंडळ वैराग संचलित सरस्वती प्रशाला सिंदफळ या प्रशालेस उपविभागीय कार्यालय तुळजापूर येथील पिंक पथकाने भेट देवून विद्यार्थी -विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक शहाजी आगलावे होते.याप्रसंगी उपविभागीय कार्यालयाचे पोहेकॉ संगान्ना बगले यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनीना काही समस्या अथवा अडचणी असल्यास पिंक पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन बगले यांनी केले. पिंक पथकातील अधिकाऱ्यांची ओळख सहशिक्षक आनंदकुमार डुरे यांनी करून दिली व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. यावेळी प्रशालेतील आठवी ,नववी ,दहावीतील विद्यार्थी ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top