धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आले.

प्रथम प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन केले. तर प्रचार्यांनी आपल्या प्रास्ताविकात आरक्षणाचे जनक, बहुजनासाठी सक्तीचे व मोफत शिक्षण मिळावे यासह त्यांनी राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना  मुलांपुढे ठेवल्या.

प्रशालेत वक्तृत्त , निबंध स्पर्धा आयोजित करून राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा व विचारांचा जागर या निमित्ताने  करण्यात आला. तर इ 9 वी च्या व एन .एन.सी च्या मुलांनी सामाजिक न्याय दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये हिरीरिने भाग घेतला. प्रशालेतून निघालेल्या या रॅलीचे उद्घाटन प्राचार्य नंदकुमार नन्नवरे व उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, श्रीमती बी.बी. गुंड, सुनील कोरडे यांच्या हस्ते झाले यावेळी ए.व्ही. शेंडगे, डी.व्ही. इनामदार, प्रा .विवेक कापसे उपस्थित होते.

 
Top