भूम (प्रतिनिधी)- वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध कृषी पुरस्काराचे बुधवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये भूम एमआयडीसीतील उद्योजक निर्मल मिल्क खवा क्लस्टरचे अध्यक्ष विनोद जोगदंड यांची कृषी पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
भारतातील सौर उर्जेवर चालणाऱ्या एकमेव खवा उत्पादनामध्ये या कृषी प्रक्रिया करून हवा उत्पादन केले जाते. त्याच्यासाठी विनोद जोगदंड यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या 112 व्या जन्मदिनी व कृषी दिनानिमित्त दिनांक 1 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे वसंतराव नाईक पुरस्कार वितरण समारंभामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरित होणार आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांच्या अभिनंदन होत आहे. भूम सारख्या ग्रामीण ठिकाणी त्यांनी सौर उर्जेवरील दूध प्रक्रिया करून खवा तयार करून सदर प्रकल्प उभा केल्याबद्दल तालुक्यातून व सर्व दूध उत्पादकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.