तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे तेरणा नदीच्या तिरावर शेगाव येथील श्री गजानन महाराज व श्री संत गोरोबा काका या दोन संतांची भेट झाली.यावेळी दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड दर्शनासाठी गर्दी केली होती.पालखीचे तेर येथे आगमन होताच तेरच्या सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या प्रशासक रूपाली कोरे यांनी स्वागत केले.

शेगाव येथील श्री गजानन महाराज यांची पालखी आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे जात असताना प्रतिवर्षाप्रमाणे 25 जूनला सकाळी आठ वाजता तेर येथे श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात पालखीचे आगमन झाले.यावेळी श्री गजानन महाराज व श्री संत गोरोबा काका यांची भेट झाली.हा क्षण पहाण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.तेर येथील नागरिकांनी श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात वारकऱ्यांना अल्पउपहाराची सोय केली होती.पालखी मार्गावर जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.श्री गजानन महाराज यांच्या पालखीच्या दर्शनासाठी तेर व परीसरातील भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.


वारक-यांची मोफत दाढी, कटींग

शेगाव येथील श्री गजानन महाराज यांच्या पालखीतील वारकऱ्यांची तेर येथील नाभिक समाजाच्या वतीने तेर येथे मोफत दाढी, कटींग करण्यात आली.यावेळी धनाजी सूर्यवंशी, सुरेश माने,जनकराज जगदाळे , प्रशांत सूर्यवंशी, काका राऊत, समाधान राऊत, चंद्रकांत घोडके, बालाजी सम्रत, उमाकांत सम्रत, ओंकार सूर्यवंशी, श्रीकांत सूर्यवंशी,गौरव कचरे,बबलू राऊत, धनंजय सूर्यवंशी,राज राऊत, नितीन झांबरे, हरीभाऊ झांबरे, गजानन राऊत,वैजीनाथ राऊत, सोमनाथ यादव, संदीप राऊत यांनी मोफत सेवा केली.

 
Top