धाराशिव (प्रतिनिधी)- भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, धाराशिव शहरात शिवसेना (ठाकरे गट) च्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार निषेध केला.
शेतकऱ्यांबाबत अपमानकारक भाषा वापरत लोणीकर यांनी, “तुझ्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनी दिले, तुझ्या आई, बहिणी व बायकोला लाडकी बहीण योजनेतून आम्ही पैसे दिले; तुझ्या अंगावरचे कपडे, बूट आम्हीच दिले,“ असे विधान केले होते. या विधानामुळे शेतकरी आणि सामान्य जनतेत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये ठाकरे गटाने आंदोलन छेडले. आंदोलनावेळी शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव म्हणाले, “बबनराव लोणीकर हे शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. शेतकरी राजा पिकवतो म्हणून आम्ही खाऊ शकतो. शेतकऱ्यांच्या घामातून गाड्यांमधलं डिझेल भरतं, आणि याच शेतकऱ्यांचा अपमान करणं हे लाजीरवाणं आहे. यापुढे लोणीकर यांनी अशी भाषा केल्यास शेतकरी हात काठी घेतील असा इशारा दिला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख रवि वाघमारे,जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, नगरसेवक बाळासाहेब काकडे,राणा बनसोडे, सिध्देश्वर कोळी, तुषार निंबाळकर, पंकज पाटील, अशोक पेठे, देवानंद एडके, विधानसभा अध्यक्ष शौकत शेख, नितीन गरड, राकेश सुर्यवंशी, अभिराज कदम, बंडू आदरकर, सुरेश गवळी, पांडू भोसले, नाना घाटगे, कालिदास शेरकर, सतिश लोंढे आदिसह पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
तुळजापूरमध्ये ही आंदोलन
तुळजापूर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या वतीने छञपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर जोडे मारून शुक्रवार दि. 27 जून रोजी आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शामलताई वडणे, जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर, जितेंद्र कानडे, उपतालुका प्रमुख सुनिल जाधव, राहुल खपले, अर्जुन साळूंके, प्रमुख सुनील जाधव, बाळकृष्ण घोडके, सरदार सिंग ठाकूर, रोहित चव्हाण, अमोल गवळी, शाम माळी, विकास भोसले, शाहूराज लोखंडे, मोहन क्षीरसागर सिद्राम कारभारी, बालाजी पांचाळ,नवनाथ जगताप,अनमोल साळुंखे दशरथ ठाकूर भोलू पाटील यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.