भूम (प्रतिनिधी)- भूम आगारातील यांत्रिक आबा भडके यांच्या सेवानिवृत्तीचा  कार्यक्रम नियोजित असताना आगारातील मयत दिवटे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे. 

मागील आठवड्यामध्ये  आगारातील यांत्रिक  सतीश दिवटे यांचे निधन झाल्याने  भडके (आबा)यांनी सदरचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा रद्द करून साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले व दिवटे परिवारास त्यांच्यातर्फे रुपये 11000/ एवढी आर्थिक मदत  दिवटे यांचे चिरंजीव प्रथमेश व वडील यांच्याकडे देण्यात आली .यावेळी आगारप्रमुख  उल्हास शिंनगारे , आबा भडके , भरत साठे,श्रीकांत सुरवसे कामगार संघटनेचे महेश शिंदे नामदेव नागरगोजे बंडू डोके अमीन शेख यांच्यासह ,आगारातील सर्व अधिकारी पर्यवेक्षक कर्मचारी उपस्थित होते . दरम्यान गेले 36 वर्षापासून भूम आगारात कामगार संघटनेचे काम करणाऱ्या भडके यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 
Top