कळंब (प्रतिनिधी)- नीट - 2025 स्पर्धा परिक्षेत घवघवीत यश संपादन करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम बी बी एस अभ्यासक्रमा साठी प्रवेश निश्चित केल्या बद्दल अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, मुंबई च्या वतीने कु आरोही सत्यप्रेम वारे (518) आणि शुभम फुलचंद चादर (501) यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्टेथोस्कोप देऊन गौरवण्यात आले व पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 

यावेळी प्रबोधन मंचाचे डॉ रामकृष्ण लोंढे, संतोष घाटूळे, नानासाहेब कवडे, आप्पासाहेब कसपटे, अशोक शिंपले, डॉ सत्यप्रेम वारे, सौ अनुसया वारे मॅडम, फुलचंद चादर, डॉ अभिजित लोंढे, आप्पासाहेब वाघमोडे, सचिन सलगर, सुनील पाटील, अजीत गायके आदी उपस्थित होते.

 
Top