भूम (प्रतिनिधी)- सोलापूर - धूळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवाशाची सोन्याची चैन चोरणा-या आरोपींना वाशी पोलीसांनी धडाकेबाज कारवाई करून अवघ्या आठ तासात आरोपींना गजाआड करून चोरलेले सोन्याची चैन हस्तगत केली आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 20 जून रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्यासुमारास दिपक भारत यादव रा. धनकवडी ता. धारूर जि.बीड हे त्यांचे दोन साथीदारांसह यांचेसह कार क्र. एम. एच. 21-9695 ने  तुळजापुर, येरमाळा येथे दर्शनासाठी गेलेले होते. ते दर्शन करून परत बीडकडे जात असताना सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पारगांव टोलनाक्याचे पुढे कांही अंतरावर लघुशंकेसाठी गाडी थांबवून गाडी रोडच्या बाजुला लावुन गाडीच्या खाली उतरून लघुशंका करून परत गाडीकडे जात असता दोन अनोळखी इसम यांनी दादा कुठले आहेत. असे विचारून फिर्यादी यांचे गळयामध्ये असलेली चार तोळे वजनाची सोन्याची चैन किंमत 2 लाख 80 हजार रूपयाची खेचुन घेवुन पळुन गेले. त्यावरून दिपक यादव यांनी वाशी पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून वाशी पो.स्टे.चे पोहेकॉ  आर.बी.लाटे, यांनी सहका-यांसह घटनास्थळी जावून गुप्त खब-यामार्फत माहीती घेवून खात्रीशिर माहितीच्या आधारे नवनाथ उर्फ बालू कल्याण पवार व भिमा छनू पवार रा. लोणखस पारधी पेढी ता. वाशी यांना ताब्यात घेवून पोलीसी खाक्या दाखवताच सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. व मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करून त्याचेवर वाशी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग धाराशिव चार्ज भूम यांचे मार्गदर्शनाखाली वाशीचे पो. नि. एस. आर. थोरात, सपोनि एस. व्ही. सावंत, ए. बी.भाळे,  पोहेकॉ राजू लाटे, बळीराम यादव, बाळासाहेब औताडे, नासेर सय्यद, मलंगनेर, पोकॉ गिराम,  नरवडे, यांनी धडाकेबाज कारवाई करून आरोपींना अवघ्या आठ तासात जेरबंद करून मुद्देमाल हस्तगत केला आहे.  तालुक्यातील पारगाव ते येडशी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर वाहने आवडून व चालू वाहनांनधून चे-यांचे प्रमाण वाढलेले असून याबाबत अटक केलेल्या आरोपींकडून चौकशी करून धागेदोरे मिळविण्याचा प्रयत्न वाशी पोलीस करीत आहेत.


 
Top