धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.व्ही. पी. एज्युकेशनल कॅम्पस,छत्रपती संभाजी नगर रोड धाराशिव येथील फार्मसी महाविद्यालयाचे एकूण आठ विद्यार्थी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रीसर्च नाईपर 2025 साठी पात्र ठरले आहेत.
फार्मसी विद्याशाखेच्या राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्थांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी नाईपर ही परीक्षा पात्र व्हावे लागते. शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता एस.बी.एन.एम फार्मसी महाविद्यालयातील आनंददिप शिंदे, मधुरा मुंडे, प्रथमेश कटकदौंड, प्रतीक चंदनशिव तसेच आर.पी.कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रगती कदम, दिव्या गोरे, सय्यद पटेल आणि प्रणिता पाठक हे विद्यार्थी पात्र झाले आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, संस्थेचे मार्गदर्शक करण प्रतापसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसेच एस.बी.एन.एम फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे, आर.पी.कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.गाझी शेख, प्रा. डॉ. गणेश मते, प्रा. डॉ. विक्रांत नवले, प्रा. मुजकिर पठाण, प्रा. रोहिणी निकम, प्रा. राजेंद्र नागरगोजे, प्रा. प्रविण धस, प्रा. सोहेल तांबोळी, प्रा. स्नेहल माने, प्रा. प्रियंका हजारे, प्रा. फिजा पठाण तसेच फार्मसी महाविद्यालयातील व व्ही.पी. एज्युकेशनल कॅम्पसमधील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.