भूम (प्रतिनिधी)- चिखली तालुका, जिल्हा धाराशिव येथे पार पडलेल्या 18 वर्षे वयोगटातील निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत स्वराज क्रीडा मंडळ भूमच्या मुला-मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

या विजयी संघात मुलांच्या गटातून स्वराज मुळे, विश्वजीत सुपेकर, यशोदीप कांबळे, मयूर साठे, सुजय कुटे, आदित्य जगदाळे, विधायक आहेर, साहिल सुरवसे, शिवकुमार सुपेकर, अमित राऊत व पृथ्वीराज पवार यांचा समावेश होता. तर मुलींच्या गटातून साक्षी मिसाळ, वैष्णवी बाबर, समीक्षा कदम, राधिका जाधव, राजश्री लगाडे, आरती शेंडगे, राजनंदनी मिसाळ व आर्या खटाळ यांनी संघाचे प्रतिनिधित्व केले.

या संघांना रविंद्र हायस्कूलचे क्रीडा शिक्षक व  कबड्डी कोच अमर सुपेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना निलेश व्हरे, गणेश सुपेकर, अक्षय बाराते आणि स्वप्निल सुपेकर यांचीही मोलाची साथ मिळाली. या स्पर्धेच्या यशानंतर महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह साठे सर, धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण मोहीते, अमरनाथ राऊत, मोहन पाटील व नितीन हुबे यांनी विजेत्या संघाला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top