धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंहजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी महत्वाचे म्हणजे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. विद्यार्थी आणि स्टाफ यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी विद्यापीठाच्या खेळामध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षक डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तसेच यावेळी महाविद्यालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले तर काही वृक्षांना आकर्षक असे कठडे तयार करून त्याला रंग देण्यात आला.
या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने ,प्रा चंद्रजीत जाधव ,डॉ. डी डी दाते,डॉ.उषा वडणे , डॉ.प्रीती माने ,प्रा.शीतल पवार ,प्रा.पी एम.पवार ,प्रा.सुनीता गुंजाळ ,प्रा ज्ञानराज निंबाळकर , प्रा. प्रशांत जैन ,प्रा डी डी मुंढे ,श्री.आर एल मुंढे, कार्यालय अधीक्षक हेमंत निंबाळकर
यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले डॉ. साहेबांच्या कार्याविषयी डॉ. प्रीती माने ,डॉ.उषा वडणे , डॉ.डी.डी. दाते ,प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने,प्रा सुनीता गुंजाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी समता कॉलनीतील स्त्री रुग्णालयातील सर्व महिला रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांमध्ये कर्मचारी व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.