धाराशिव (प्रतिनिधी)- आखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने आज धाराशिव जिल्हा परिषदेचे नूतन शिक्षणाधिकारी नागेश मापारी, नूतन उप शिक्षणाधिकारी कैलास पिकवणे साहेब,  नूतन अधिक्षक वर्ग 2 अरुण शिंगडे साहेब,आदरणीय जेष्ठ विस्तार अधिकारी मल्हारी माने साहेब,नूतन प्रशासन अधीकारी बलभीम रेड्डी साहेब,यांचा सत्कार आणि स्वागत समारंभ आयोजित केला होता 

अखिलचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय लालासाहेब मगर, राज्य नेते  तथा जिल्हाध्यक्ष बशीर भाई तांबोळी,राज्य नेत्या सविताताई पांढरे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोकाशे,नगर परिषद जिल्हाध्यक्ष पवार सर यांच्या हस्ते शाल बुके आणि  दर्जेदार पुस्तक भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.  त्याचबरोबर शिक्षकांची कामे वेळेत आणि योग्य पद्धतीने करण्याची तसेच धाराशिव जिल्हा गुणवंत्तेत प्रथम आणण्यासाठी प्रशासन पातळीवर संघटनेला सहकार्य करण्याची मागणी बशीर तांबोळी व लालासाहेब मगर यांनी केली, आभार अविनाश मोकाशे यांनी मानले.

याप्रसंगी सहसचिव राजाभाऊ आकोसकर, जिल्हा उपाध्यक्ष मालोजी वाघमारे, बोडके नागनाथ ,शाहू सोसायटी चेअरमन सुरेश भालेराव,बालाजी निंबाळकर,मिलिंद धावारे महावीर गडदे, बी एस वाघमारे ,राजेंद्र चव्हाण रजनीकांत दुपारे, दत्ता बामणीकर  शिवाजी साखरे ,बाळासाहेब चिवडे, मारुती काळे, श्रीहरी बिडवे ,सोमनाथ केवटे ,सुधीर पवार, नागनाथ मुडबे आणि  जिल्हाभरातून आलेले असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top