कळंब (प्रतिनिधी)- मंगळवार दि 24 जून 2025 रोजी रात्री 11-30 चे दरम्यान धाराशिव येथील पार्वती हॉस्पिटल वर अज्ञात व्यक्तींनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा कळंब आय एम ए आणि कळंब डॉक्टर संघटने तर्फे काळ्या फिती लाऊन जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी तहसीलदार हेमंत ढोकळे यांच्या वतीने नायब तहसीलदार गोपाळ भराडिया यांनी निवेदन स्विकारले. हल्लेखोरांना तातडीने अटक करून डॉक्टर व हॉस्पिटल हल्ला प्रतिबंध कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. अलिकडे हॉस्पिटल वरील हल्ल्याचे प्रमाण वाढताना दिसून येत असुन ही एक चिंतेची बाब बनली आहे. यावर शासनाने समाजविघातक शक्ती विरोधी कडक धोरण अमलात आणण्याची गरज आहे असे सर्वांना वाटते. असे केल्याने सामाजिक शांतता वाढण्यास मदत होईल.
निवेदनावर शाखाध्यक्ष डॉ शितल कुंकुलोळ, सचिव डॉ सत्यप्रेम वारे, माजी प्रदेशाध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे, डॉ शिल्पा ढेंगळे, डॉ अजित देशमुख, डॉ महादेव कोरसळे, डॉ प्रियंका जाधवर डॉ गोवर्धन तांबारे, विवेक शिंदे,डॉ अभय मनगिरे ई च्या सह्या आहेत.