धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे अंतर्गत विविध राज्य क्रीडा प्रबोधिनींत सन 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.यामध्ये खेळाडूंना निवासी व अनिवासी स्वरूपात प्रवेश दिला जाणार असून,ही प्रक्रिया 7 ते 8 जुलै 2025 दरम्यान 50 टक्के सरळ प्रवेश व 50 टक्के कौशल्य चाचणीच्या आधारे पार पडणार आहे. प्रवेशासाठी पात्र खेळ व चाचणी प्रकार.खेळ - हॅण्डबॉल,जलतरण, सायकलींग,फुटबॉल,ज्युदो,जिम्नॅस्टिक्स याचा समावेश आहे.

सरळ प्रवेशासाठी पात्रता - संबंधित खेळात राज्यस्तरीय पदक प्राप्त किंवा राष्ट्रीयस्तरावर प्रतिनिधित्व करणारे,19 वर्षांखालील खेळाडू.कौशल्य चाचणीसाठी पात्रता - संबंधित खेळात राज्यस्तरीय सहभाग असलेले,19 वर्षांखालील खेळाडू. सरळ प्रवेशासाठी पात्र खेळाडूंना तज्ज्ञ समिती समोर चाचणी द्यावी लागेल,तर इतर खेळाडूंना खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे निवडण्यात येईल. नोंदणीसाठी अंतिम तारीख: 23 जून 2025 आहे.जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी मूळ क्रीडा प्रमाणपत्रासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव येथे संपर्क साधावा.

 
Top