नळदुर्ग (प्रतिनिधी)-  छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य महान असुन त्यांच्या कार्याची तुलनाच होऊ शकत नाही. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे जयहिंद प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. असे नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव यांनी जयहिंद प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन करतांना म्हटले आहे.

दि. 6 जुन रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त नळदुर्ग येथे जयहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय बताले यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. मल्लिकार्जुन मंदिरात झालेल्या या रक्तदान शिबिराचे उदघाटन पोलिस निरीक्षक सचिन यादव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी नगराध्यक्ष शहेबाज काजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शफीभाई शेख, शिवसेनेचे कमलाकर चव्हाण, शिवसेनेचे ज्ञानेश्वर घोडके, सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोळुंके, भाजपचे सुशांत भुमकर, सतीश पुदाले, अजहर जहागीरदार, संजय जाधव, पत्रकार विलास येडगे. भाजपचे माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, रोटरी क्लबचे अध्यक्ष रमेश पिस्के, गवळी गुरुजी आदिजण उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पोलिस निरीक्षक सचिन यादव यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रीत करुन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. यावेळी  प्रास्ताविक संजय बताले यांनी केले.  यावेळी शफीभाई शेख, कमलाकर चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास श्रमिक पोतदार, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, दयानंद स्वामी, संदीप सुरवसे, समीर मोरे, रघुनाथ नागणे, किशोर नळदुर्गकर, धीमाजी घुगे यांच्यासह नागरीक उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात 134 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी जयहिंद प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

 
Top