धाराशिव (प्रतिनिधी)- युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख निलेश शिंदे यांच्यासह हरिदास शिंदे, बालाजी झेंडे, आदित्य शिंदे, निसार सय्यद, अनिमेश सोनकवडे, स्वप्नील शिंदे, रत्नदीप पडोळे आणि वैभव शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.

हा पक्ष प्रवेश मुंबई येथे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शिवसेनेचे सह-संपर्कप्रमुख भगवान देवकते, आकाश कोकाटे आणि युवासेना शहरप्रमुख सागर कदमही उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे धाराशिवमधील उबाठा च्या गोटात अस्वस्थता पसरली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. शिवसेनेत गेलेल्या कार्यकर्त्यांनी “विकासासाठी आणि खऱ्या शिवसेनेसाठी“ हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे.

 
Top