धाराशिव (प्रतिनिधी)- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदभार संभाळून आज 11 वर्षे झाली आहेत. या 11 वर्षाच्या काळात आत्मनिर्भय भारत, विकसित भारत, मेक इन इंडिया या प्रकारे  मोदी यांनी देश उभारला आहे. त्यांच्या कार्यकाळात महाविकास आघाडीपेक्षा जास्त निधी महाराष्ट्राला मिळाला आहे. गेल्या 11 वर्षात 10 लाख कोटी रूपये महाराष्ट्राला विविध योजनेसाठी व विकास कामे करण्यासाठी मिळाली आहेत. अशी माहिती भाजपाचे आमदार तथा मित्रा चे उपाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

बुधवार दि. 11 जून रोजी भाजपा कार्यालयात घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार पाटील यांनी महाविकास आघाडी ज्यावेळी केंद्रात सत्तेवर होती त्यावेळीस 10 वर्षात त्यांनी महाराष्ट्राला फक्त विकास कामासाठी 1 लाख कोटी रूपये दिले होते. परंतु मोदी यांच्य कार्यकाळात मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्राला मिळाला. नॅशनल हायवे, नवीन रेल्वे मार्ग,  पाणी पुरवठा योजना आदी मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्या. गेल्या पाच वर्षात पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2 हजार कोटी रूपये नुकसान भरपाई मिळाली आहे. देश पातळीवर राम मंदिर, काशी विश्वनाथ कॅरीडोर, 370 कलम हटविणे, आयआयटी, एम्स, मेडिकल कॉलेज यांची संख्या वाढविणे आदीमुळे देश विकसित होत आहे. देशाची अर्थ व्यवस्था मजबूत होत असून, जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. जिल्ह्यात केंद्र सरकारच्या योजनेमुळे टेकनिकल पॉर्कचे काम लवकरच सुरू होईल असे सांगितले. यावेळी मजूर फेडरेशनचे चेअरमन सतीश दंडनाईक, सुनिल काकडे, राजसिंह राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते. 

 
Top