धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरात एका 35 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून, तिला जातीवाचक शिवीगाळ करत दांड्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात एका तरूणासह इतर आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना 25  मे 2025 रोजी दुपारी 12.00 ते सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला (नाव व गाव गोपनीय) घरी एकटी असताना गावातीलच एका तरूणाने तिला फोन केला. मला तुला भेटायचे आहे, तू जर मला भेटली नाहीस तर मी फाशी घेईन, अशी धमकी देत त्याने महिलेला बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी तरूणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटने प्रकरणी पीडित महिलेने 26 मे रोजी 2025 रोजी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 64 (1), 126 (2), 118 (1), 352, 351 (2),3(5) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 (ई), (आर), (एस), (डब्ल्यु), (i)(ii) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. 

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top