भूम (प्रतिनिधी)- महावितरण मधील प्रधान यंत्रचालक दिलीप शेटे व एन एस गुंजाळ यांच्या सेवानिवृत्ती निमित्त भूम येथील यश मंगल कार्यालय येथे दि. 29 मे रोजी सेवानिवृत्ती निमित्त कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब भाकरे होते. या कार्यक्रमाला अरविंद बुलबुले, मुख्य अभियंता महावितरण, सय्यद झहीरुद्दीन, संजय आडे, कुलकर्णी, उदय मधुरे, ओ. व्ही. साठे, जाधव, मार्कंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन्ही प्रधान यंत्राचालक यांचा व सेवानिवृत्ती निमित्त सहपत्नीक महावितरणच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी लातूर झोन, धाराशिव व डिव्हिजन आणि तुळजापूर, भूम, डिव्हिजन सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.