परंडा (प्रतिनिधी)- तालुक्यातील भोंजा हवेली येथे शुक्रवार दि.30 मे रोजी खरीप आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सोयाबीन क्षमता तपासणी बीज प्रक्रिया घरचे बियाणे वापरताना घ्यावयाची काळजी माती परीक्षणाचे महत्त्व जैविक शेतीसाठी सेंद्रिय शेतीचे महत्व बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे,कृषी पर्यवेक्षक बी.एन. हांगे,मंडळ कृषी अधिकारी संभाजीराजे माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी गावातील प्रगतशील शेतकरी, प्रीतम भोसले सहायक कृषी अधिकारी, महादेव शिंदे सहायक कृषी अधिकारी, विनोद भाग्यवंत सहायक, कृषी अधिकारी शेतकरी प्रकाश नेटके, डायरेक्टर गणेशदादा नेटके, बागायतदार अमोल मोरे, नवनाथ नेटके, प्रदिप नेटके, बिरमल कोंडलकर, देविदास सरवदे, विष्णू मोरे, दादासाहेब जगताप, बापुराव नेटके, राम घाडगे, लव्हू जाधव, सुर्यकांत नेटके, नंदराम मोरे, प्रदिप मोरे, बापू सरवदे, गुरूदास नेटके, भैरवनाथ मोरे, अजित नेटके, तुषार नेटके, रूपेश भांदुर्गे, ऋषीनाथ नेटके, हनुमंत घाडगे, जीवन मोरे, सदाशिव मोरे, दादासाहेब जगताप, ओम नेटके आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.