धाराशिव (प्रतिनिधी) - विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची 2569 वी जयंती धाराशिव शहरात ठिकठिकाणी विविध उपक्रमांनी सोमवार, 12 मे रोजी साजरी करण्यात आली. सायंकाळी शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत युद्ध नको, बुद्ध हवा यांसह विविध घोषणांनी परिसर शहर दुमदुमले होते. या रॅलीत शहर व परिसरातील उपासक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सोमवार 12 मे रोजी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना धुप, दीप व पुष्प अर्पण करून त्रिशरण पंचशील व गाथा पठण करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभा, स्मृती बुद्ध विहार धाराशिव,समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.भीम नगर येथील क्रांती चौक येथून सायंकाळी सात वाजता भव्य धम्म रॅलीस प्रारंभ झाला. क्रांती चौक येथून ही रॅली सिव्हिल हॉस्पिटल, मारवाडी गल्ली, गवळी गल्ली, नेहरू चौक, काळा मारुती चौक, पोस्ट ऑफिस,लेडीज क्लब,संत गाडगेबाबा चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सांगता झाली. यावेळी उपासक उपासिका यांनी त्रिशरण,पंचशील सामुदायिक वंदना घेण्यात आली. या रॅलीमध्ये युद्ध नको बुद्ध हवा, बौद्ध धम्माचा विजय असो, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, उठा बंधुनो जागे व्हा बौद्ध धम्माचा स्वीकार करा, बुद्ध सुताची ची एकच वाणी बुद्धम् शरणम् गच्छामि, सम्राट अशोक राजाचा विजय असो आदी घोषणांनी संपूर्ण धाराशिव शहर दुमदुमून गेले होते.
या रॅलीमध्ये धाराशिव शहर व परिसरातील उपासक उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून हाती पंचशील ध्वज घेऊन सहभागी झाले होते. भिख्खू संघाचे भंते अनिरुद्ध, भंते सुमेध, भंते अश्वजित, भंते सोपाक, भंते नंद, भंते दीपंकर,भंते राहुल, ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा केंद्रीय अध्यक्ष ए.जी तायडे जिल्हा अधक्ष राजश्री कदम,तालुका अधक्ष्य विजयमाला धावारे, गुणवंत सोनवणे, धनंजय वाघमारे, शिलाताई चंदनशिवे,सचिन ,बाबासाहेब बनसोडे, स्वराज जानराव,सचिन दिलपाक,बापू जावळे, प्रवीण बनसोडे, संदीप बनसोडे, उपस्थित होते. या रॅलीच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभा, स्मृति बुद्ध विहार आणि समता सैनिक दल धाराशिव शाखा चे पदाधिकारी आणि सदस्य तसेच उपासक आणि उपासीका यांनी परिश्रम घेतले.