धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा दहावीचा निकाल आज मंगळवारी जाहीर झाला. या परिक्षेच्या निकालामध्ये जि. प. प्रशाला वडगाव ( सि ) तालुका धाराशिव या शाळेचा 100% टक्के निकाल लागला असून शाळेतील विद्यार्थी सिद्धेश्वर महादेव क्षीरसागर हा 92.40% गुण घेऊन शाळेत प्रथम आला आहे. तर द्वितीय पार्थ शांतीलाल जाधव 86% गुण , तृतीय माधुरी मधुकर मुळे 79.80% टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. प्रशालेचे 07 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीमध्ये सात विद्यार्थी व द्वितीय श्रेणीमध्ये चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन वडगाव ( सि ). चे भूमिपुत्र शिक्षण उपसंचालक डाँ. गणपतराव मोरे फ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ पाटील व सर्व सदस्य,युवा नेते अंकुश काका मोरे फ, मा. पं.स. सदस्य गजेंद्र जाधव, सरपंच बळीराम कांबळे फ, उपसरपंच जयराम मोरे, प्रशालेच्या मुख्याधापिका ज्योती राऊत फ, शिक्षिका सरोजा पाटील, रजनी रावळे फ, सुचिता शेलार, निर्मला गुरव व शिक्षकेतर कर्मचारी भूषण मदने आदींसह गुरुजी विचार मंच व समस्त गावकऱ्यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.