तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सिंदफळ शिवारातील एका विहरीत पडलेल्या कोल्ह्यास वनविभागाने तीन तासाचा अथक प्रयत्नानंतर बाहेर काढुन जीवदान देवुन आपसिंगा जगंलात अधिवासात सोडले सदरील घटना गुरुवार दि. 22 मे रोजी घडली.
या बाबतीत अधिक माहीती अशी कि, सिंदफळ शिवारातील विहरीतराञी विहर न दिसल्याने कोल्हा पडला याची माहीती वनविभागाला कळविताच त्याचे पथक पिंजऱ्यासह दाखल झाले. सकाळी 8.30 दरम्यान काढण्याची कारवाई सुरु झाल्यानंतर 11.30 जाळीतुन सुखरुप कोल्हा विहरीबाहेर काढला. ही मोहीम वनपरिक्षेञ अधिकारी नागनाथ पचरंडे मार्गदर्शनाखाली वनपाल विनोद पाटील, वनरक्षक शेवाळे, वनरक्षक तामलवाडी व वन मजूर यांनी यशस्वी पणे पार पाडली.