धाराशिव(प्रतिनिधी)- शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिमेत विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महाराष्ट्रातील तालुकास्तरीय शासकीय कार्यालयात धाराशिव जिल्ह्यातील ७ कार्यालयांना प्रथम क्रमांक,७ कार्यालयांना द्वितीय तर १ कार्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी या उत्तम कामगिरीबद्दल या सर्व कार्यालयांच्या कार्यालय प्रमुख व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरीत तालुकास्तरीय शासकीय कार्यालयात धाराशिव जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालय,उमरगा,गटविकास अधिकारी कार्यालय,परंडा,तालुका वैद्यकीय अधिकारी,कळंब,उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय,धाराशिव,तालुका कृषी अधिकारी कार्यालय,भूम,पोलीस निरीक्षक कार्यालय,उमरगा,बाल संरक्षण अधिकारी कार्यालय, धाराशिव या ७ कार्यालयांचा यात समावेश आहे.
तर द्वितीय क्रमांक आलेल्या तहसील कार्यालय,धाराशिव,उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय,भूम,तालुका कृषी अधिकारी कार्यालय,धाराशिव, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,उमरगा,बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (श),धाराशिव,उप अभियंता (सार्वजनिक बांधकाम), तुळजापूर,उप अभियंता (जलसंपदा), पाटबंधारे उपविभाग क्र.८ लोहारा या कार्यालयांचा समावेश आहे.तर तृतीय क्रमांक उप अभियंता पाणीपुरवठा, भूम या कार्यालयांस मिळाला आहे.