धाराशिव (प्रतिनिधी)- आज धाराशिव नगरीत मध्यवर्ती शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले. जर वर्षी प्रमाणे या वर्षी ही मध्यवर्ती शिवशाही प्रतिष्ठानने आगळा-वेगळा, मनाला स्पर्शून जाणारा निर्णय  डीजे, तासंतास होणारी गोंगाटी मिरवणूक न करता, 10 गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करून त्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण केली आहे. या शिलाई मिशनचे वाटप खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते वाटप करून या उपक्रमातून केवळ एक सामाजिक जबाबदारी नव्हे, तर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांना खरं खरं मानवंदन देण्यात आली.

मध्यवर्ती शिवशाही प्रतिष्ठान मध्यवर्ती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती 2025 यांनी मिरवणुकीचा (डॉल्बीमुक्त)सर्व खर्च टाळून आपल्या शहरातील यशवंत नगर येथील गरजू महिलाना शिलाई मशिनचे वाटप केले आहे. यावेळी मध्यवर्ती शिवशाही युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लखन देशमुख, मार्गदर्शक अभिजीत  देशमुख,धर्मराज  सूर्यवंशी,अमित उंबरे,राम मुंडे, आधारस्तंभ विश्वजीत देशमुख, अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख ,उपाध्यक्ष बिन्नी तावसकर,महेश काका सुरवसे सोमनाथ गुरव, रमण जाधव, पंकज पाटील,ओंकार झोरे, आकाश भगत, निखिल देशमुख  शेखर घोडके, सागर वेदपाठक, श्रीराम शिंदे, अतुल ढोकर ,स्वप्निल जाधव,अनुराग गाडेकर, लखन मुंडे ,आदेश डक, राज लोमटे, अश्विन लिंगे, नाना महामुनी, राजाभाऊ ढेकणे, सुशांत भैय्या लोंढे, शुभम सुरवसे, औदुंबर देशमुख, अख्खी अंकुश ,पृथ्वीराज मुळे, आदी उपस्थित होते.

 
Top