धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय गंगाधर शिंगाडे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. यानिमित्त तमाम धाराशिवकरांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ॲड.खंडेराव चौरे नगरसेवक खलील सय्यद, मुकुंद घुले,संजय मुंडे, पांडू आण्णा भोसले, रविंद्र सुर्यवंशी, अर्जुन पवार,सुभाष पवार, नंदकुमार शेटे, विशाल शिंगाडे, प्रसेंजित शिंगाडे,अनिरुद्ध कावळे, सुगत सोनवणे, यशवंत शिंगाडे, सारिपूत शिंगाडे यांच्यासह बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.