धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल 13 मे रोजी जाहीर करण्यात आला.उस्मानाबाद जिल्हा स्वातंत्र्यसैनिक समिती संचलित धाराशिव प्रशालेचा निकाल 86.20 % लागला आहे.
यावर्षी एकूण 29 विद्यार्थी परीक्षेस बसले होते पैकी 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये विशेष प्राविण्य 1 प्रथम श्रेणी 8 द्वितीय श्रेणी 13 उत्तीर्ण 3 झाले आहेत. प्रशालेत प्रथम दिव्या जीवन वाळा, द्वितीय संध्या महादेव काकडे, तृतीय निजबा अहमद शेख विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मालखरे,सचिव दत्तात्रय गणेश,उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव,कोषाध्यक्ष उमाजीराव देशमुख, सहसचिव समीर मालखरे,ॲड.सुग्रीव नेरे, संचालिका चित्राताई मालखरे, बाळासाहेब सुर्यवशी, सुरेश धारूरकर, प्रदिप गणेश यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.