धाराशिव (प्रतिनिधी)- समर्थ अर्बन बँक आणि रुपामाता उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने क्रृतज्ञता सोहळ्यात प्रतिभावंतांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रम आयोजित करण्या मागची भूमिका अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड यांनी विषद केली. यावेळी ॲड. मिलिंद पाटील यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमात पत्रकार देविदास पाठक, जी. बी. राजपूत, रवि केसकर, नितीन तावडे, डॉ.सतिश कदम, युवराज नळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व सत्कार मुर्तींनी मनोगत व्यक्त केले. शेवटी ॲड. शरद गुंड यांनी आभार मानले. यावेळी बँकेचे संचालक अशोक पाटील दुधगावकर, रामदास कोळगे, शरद गुंड, तसेच रुपामाता उद्योग व समर्थ अर्बन बँकेचे कर्मचारी डी. जी. कुलकर्णी, मिलिंद खांडेकर, बोधले, विशाल गुंड व शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.