उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा येथील ओम लॉन्स येथे शांतिदूत परिवाराच्यावतीने शांतिदूत सेवा रत्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी शांतिदूत परिवाराचे सर्वेसर्वा विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य सेवा नि. डॉ. विठ्ठलराव जाधव तसेच संस्थापक अध्यक्षा विद्याताई जाधव, मा. आमदार प्रवीण स्वामी, शरण पाटील संचालक विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरूम, स्मिता गायकवाड सोलापूर अध्यक्ष रयत शांतिदूत परिवार महाराष्ट्र, डॉ. बिराजदार तालुका आरोग्य अधिकारी, शांतिदूत परिवाराचे सर्व पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्यात मध्ये सामाजिक कार्यकर्त्या जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय सचिव तथा उमरगा येथील चव्हाण क्लिनिकच्या निसर्गोपचार तज्ञ डॉ. मंजुषाताई प्रेमनाथ चव्हाण यांना शांतिदूत सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.मंजुषाताई चव्हाण या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत या सोबतच गोरगरीब जनतेसाठी कधी मोफत तर कधी अत्यल्प दरात रोग्यांना सेवा देतात. तसेच महिलांना आहार व आरोग्य विषयक मार्गदर्शन,आर्थिक दृष्ट्या दुर्बल होत करू मुलींचे शिक्षणासाठी आर्थिक मदत तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध महिला मेळावे तसेच दर वर्षी हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करतात विधवा व गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव त्यांच्या पाठीशी उभ्या असतात व प्रत्येकाला सहकार्य व मार्गदर्शन करून प्रेरणा त्या सातत्याने देतात.