उमरगा (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीउत्सवात सन्मान मूकबधिर शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक भगवान वाघमारे यांचा गौरव करण्यात आला.
भगवान वाघमारे हे उमरगा शहारातील निवासी मूकबधिर शाळेत 32 वर्षे विशेष शिक्षक तथा मुख्याध्यापक म्हणून प्रामाणिकपणे व पूर्ण निष्ठेने सेवा दिली. ज्यांना ऐकता येत नही बोलता येत नही अश्या मूकबधिर विद्यार्थ्यांना अक्षरांची ओळख निर्मान करीत विद्यार्थ्यांना सुसंस्कृत व सृजनशील बनविण्यात मोठे योगदान दिले असून 31 मार्च 2025 रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कार्याची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती, शॉल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.यावेळी वंचित बहुजन आघाडी चे नेते रामभाऊ गायकवाड, डॉ आर डी शेंडगे, जेष्ठ नेते हरीश डावरे,वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हा प्रभारी ऍड.रमेश गायकवाड,माजी जि.प. सदस्य कैलास शिंदे,मिलींद रोकडे,डॉ स्नेहा सोनकाटे,स्वप्नील जवळगेकर,डॉ. चंद्रशेखर गायकवाड,ॲड. हिराजी पांढरे, युवराज जोगे यासह इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले.
भगवान वाघमारे यांचा सन्मान व गौरव झाल्याबद्दल बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बालाजी गायकवाड, तानाजी गायकवाड व पदाधिकारी कार्यकर्ते आणि मित्रपरिवारातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.