उमरगा (प्रतिनिधी)-पतंजली योग पीठ हरीद्वार परमपूज्य योगऋषी स्वामी रामदेव महाराज यांच्या तत्वांनुसार येणारा 21 जून विश्व योग दिवस उत्सवाप्रमाणे साजरा करण्यासाठी आपण एक महिना अगोदरच तयारी करत आहोत. त्या निमित्ताने दिनांक 01 मे ते 06 मे पर्यंत कालावधीत पहाटे 5 ते 7:30 पासून उमरगा शहरात अखंड योग शिबिराची ृंखला सुरु करत आहोत. त्यासाठी पतंजली परिवार धाराशीव व उमरगा यांचा तर्फे 6 दिवसीय निशुल्क युवा संस्कार समग्र योग साधना चिकित्सा शिबीर परमपूज्य योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांचे परम शिष्य व युवा भारत केंद्रीय प्रभारी पूज्य स्वामी आदित्य देवजी एक आदर्श युवा संन्याशी यांचा पावन सानिध्यात पार पडत आहे.तरी पतंजली परिवार उमरगा तालुक्यातील युवा युवती, बंधू भगिनी, माता पिता सर्वाना या योग शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

युवांसाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक सामर्थ्य वाढवून करियर व चारित्र्य आदर्श कसे करावे याचे उत्तम मार्गदर्शन दिले जाणार आहे . सोबत सर्व आजार कसे बरे करायचे. ध्यान प्राणायाम आसने यांचेहि मार्गदर्शन दिले जाणार आहे. या शिबिराचे स्थळ श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय शेजारी जिल्हा परिषद हायस्कूल प्रशाला मैदान उमरगा आहे. तरी या योग शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top