धाराशिव (प्रतिनिधी)-एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र च्या वतीने बालाजी शिवाजी तांबे यांना “ राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार 2025 “ हा मुंबई येथील मराठी पत्रकार भवन सभागृहात दिनांक 20 मे 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता शिक्षक आमदार विक्रम वसंतराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळ्यात सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. 

यावेळी मंचावर ज्येष्ठ  सिने अभिनेता अली खान, ज्येष्ठ सिने अभिनेत्री उषा नाडकर्णी,माजी आमदार रामराव वडकुते, मुश्ताक अंतुले,सतीश सास्ते, वैभव वर्मा,सलीम सारंग, ॲड. पवन निकम, वसीम बुऱ्हाण, आयोजक व संस्था अध्यक्ष अमजत खान, अरुण मराठे,रमाकांत कुलकर्णी  यांची प्रमुख उपस्थिती होती. एकता सेवाभावी संस्था ही उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या कर्तुत्वाचा सन्मान म्हणून हा पुरस्कार दरवर्षी देत आहे.


 
Top